जळगाव तालुक्यातील मोहाडी महिला रुग्णालयात वैद्यकीय पथकाला यश
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मोहाडी येथील महिला व बाल रुग्णालयात नववर्षाच्या पहिल्या दिवशी दि. ०१ जानेवारी रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे डॉ. मिलींद चौधरी (एम. एस. सर्जन) जळगाव व डॉ. चंदन महाजन (स्त्रीरोग तज्ञ) यांनी दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. तर डॉ. रोहन पाटील (एम एस सर्जन) जळगाव यांनी दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स ही गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया अगदी यशस्वीपणे पार पाडली.
डॉ. किरण बळीराम सोनवणे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाने भूलतज्ञ डॉ. प्राची सुरतवाला, अधिपरिचारीका दिपाली बढे, सहाय्यक अधिसेविका संगीता शिंगारे, रूपाली जोशी, नम्रता नागापूरकर व शस्त्रक्रिया विभागातील कर्मचारी यांनी सहकार्य केले. मोहाडी येथील महिला व बाल रुग्णालयात दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया जसे गर्भपिशवी काढणे, अपेंडिक्स काढणे, हर्निया दुरुस्ती या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामुल्य होतात तरी जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसंबधी मदतीसाठी चेतन परदेशी ९०६७५३१९२३ व राहुल पारचा ९६७३६३९७४१ यांना संपर्क साधावा असे आवाहन डॉ. किरण बळीराम सोनवणे यांनी जिल्ह्यातील रुग्णांना केलेले आहे.