जळगाव (प्रतिनिधी ) ;- येथील अजिंठा चौफुलीजवळ असणाऱ्या ईदगाह कॉम्लेक्स समोरील रस्त्यावर आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपर क्रमांक एमएच १९ झेड ७७४७ हे दुभाजकावर जाऊन धडकल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. दरम्यान रविवार असल्याने फारशी वर्दळ नसल्याने वाहतुकीलाही फार खोळंबा झाला नाही.