धरणगाव शहरातील कॉटन जिनिंगजवळची घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : शहराजवळील जी.एस. कॉटन जिनिंग जवळ भरधाव डंपरच्या धडकेत ६६ वर्षीय सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी ६ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली व मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय शंकर पाटील (वय ६६, रा. धरणगाव) असे मयत वृद्ध सायकलस्वाराचे नाव आहे. दत्तात्रय पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे. दत्तात्रय पाटील हे धरणगाव शहरातील एका जिनिंग कंपनीमध्ये वॉचमन म्हणून नोकरीला होते.(केसीएन) नेहमीप्रमाणे गुरुवारी दि. ६ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सायकलने कामावर जात असताना शहरातील जीएस कॉटन जिनिंग जवळ समोरून भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. या धडकेत ते चाकाखाली आल्याने ते जागीच ठार झाले. अपघात घडल्यानंतर डंपर चालक हा वाहन सोडून फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.