जळगाव ( प्रतिनिधी ) – नशिराबाद येथे डंपरच्या धडकेत दुचाकीवरील एका तरूणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
नशिराबादच्या सिद्धार्थनगरात राहणारे विशाल रंधे (वय २५), रोहित इंगळे (वय २५), उदय बोदडे (वय २३) हे तिघे एमएच-१९, डीएस-८६९२ क्रमांकाच्या दुचाकीवरून रात्री साडेबाराच्या सुमारास घरी येत होते. महामार्गावरील उड्डाण पुलाखालून सुनसगावकडे जाणार्या रस्त्यावर एमएच-१९ झेड, ४७४८ या क्रमांकाच्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात विशाल उर्फ विकी रमेश रंधे याचा जागीच मृत्यू झाला. रोहित इंगळे आणि उदय बोदडे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रोहित इंगळे याची प्रकृती चिंताजनक आहे.