पाचोरा शहरातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : येथील पाचोरा ते भडगाव रस्त्यावरील आशीर्वाद हॉटेल समोर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना दि. २२ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिलाल काशीनाथ साळवे (वय ५८ रा. पाचोरा) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. हिलाल काशिनाथ साळवे हे २२ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीई २७३८) ने पाचोरा येथून संत गाडगेबाबा नगरात येत असतांना त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणारा डंपर क्रमांक (एमएच १५ एचझेड ८८७९) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर डंपर चालक हा वाहन घेवून पसार झाला होता. याप्रकरणी अखेर पोलीस ठाण्यात डंपरवरील चालक पवनकुमार राजकुमार महंतो (वय ३७ रा. काडसमर, झारखंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पांडूरंग सोनवणे हे करीत आहे.