रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चिनावल येथे राज्यात बंदी असलेला १ लाख ६१ हजार १०५ रूपयांचा विमल गुटख्यासह ३ मोटर सायकली सावदा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्यावर सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील सावदा येथून जवळच असलेल्या चिनावल शिवारात चिनावल – उटखेडा रस्त्यावरील सुकी नदी पुलावर राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची तस्करी करीत असताना संशयित अजय शांताराम कोळी (रा. रोझोदा), यश उर्फ योगेश पितांबर चौधरी (रां.चिनावल) व अस्लम सलीम तडवी (रां. लोहारा) यांना पकडुन त्यांची चौकशी केली. त्याच्या कडून आरोग्यास अपायकारक असलेला सुगंधित केसर युक्त विमल पान मसाला गुटखा व तंबाखूजन्य गुटखा मिळुन आल्याने पोलिसांनी १ लाख ६१ हजार १०५ रुपयांच्या गुटख्यासह तीन दुचाक्या जप्त केल्या.
या संदर्भात तिघांना याना अटक करून त्यांच्यावर सावदा पोलिस स्टेशनला हे का. निलेश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई सपोनी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.