अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांचा कृति आराखडा घोषीत केल्याच्या त्याअनुषंगाने अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासनतर्फे जिल्हयात आज दि. १५ जानेवारी रोजी विशेष मोहिम राबवली. यात विविध आस्थापनांची तपासणी करुन दुध या अन्न पदार्थांच्या विविध ब्रॅण्डचे एकूण १४ नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले. त्यासमवेत मे. रविराज एजन्सी, विसनजी नगर, जळगाव यांच्याकडे दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा सुमारे रु. ४ हजार ९५ रुपयांचा साठा हा मुदतबाहय असल्याचा आढळून आला आहे.
जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीकोनातून पुनर्वापर होवू नये म्हणून तत्काळ विक्रेता यांच्या समोरच हा साठा नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त राजेशजी नार्वेकर, सह आयुक्त (नाशिक विभाग), म.ना.चौधरी, जिल्हयाचे सहायक आयुक्त (अन्न ) सं.कृ.कांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी कि.आ.साळुंके व श.म.पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.