जळगाव (प्रतिनिधी) – कोव्हिड काळात झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी जिल्हा दूध संघाने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दुधाच्या खरेदी दरात वाढ केली आहे.खरेदी दरात वाढ झाली असली तरी दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या दरात कोणीतीही दरवाढ होणार नाही.
आता नवीन खरेदी दरवाढीनुसार गायीचे दूध (गुणवत्ता ३.५ /८.५ टक्के) प्रतिलिटर एक रुपया तर म्हैस दूध (६.०/९.० टक्के गुणवत्ता) खरेदीत प्रतिलिटर ३ रुपये दरवाढ करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत जळगाव जिल्हा दूध संघाचे प्रतिदिन २ लाख लिटर दूध संकलन असून, या खरेदी दरवाढीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दरमहा सुमारे १ कोटी रुपये अतिरिक्त अदा करण्यात येणार आहेत. ही खरेदी दरवाढ दि. १ सप्टेंबरपासूनच लागू करण्यात आली आहे.