जळगाव तालुक्यातील नशिराबाद परिसरात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- ओव्हरटेक करीत दुचाकीस्वार अचानक थांबल्यामुळे मागून आलेला दुचाकीस्वार तरुण पुढील दुचाकीवर आदळून गंभीर जखमी झाला. ही घटना दि. ५ जानेवारी रोजी नशिराबादजवळील पेट्रोल पंपाजवळ घडली होती. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील धीरज विनोद तावडे (वय १९, रा. साकेगाव, भुसावळ) हा तरुण दि. ५ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज येथे (एमएच १९, डीएम २९७७) क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. यावेळी मागून दुचाकीस्वारआला. तरुणाच्या दुचाकीला अचानक ओव्हरटेक करीत त्यांच्या गाडीपुढे थांबला. त्यामुळे धीरज तायडे हा त्यांच्या दुचाकीवरुन आदळल्यामुळे त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. याप्रकरणी जखमीने दिलेल्या जबाबावरुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ योगेश वराडे हे करीत आहे.