जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातून अज्ञात चोरटयांनी रेल्वेस्थानक आणि कासमवाडी परिसरातून दोन दुचाक्या लांबविल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौदागर बाबासाहेब खामकर (वय-३१) रा. रामनगर, मेहरूण गुरूवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री २ वाजता जळगाव रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल शिल्पा येथे दुचाकी (एमएच १९ सीएन २७७१) पार्किंग केली असता ती अज्ञात चोरटयांनी लांबविल्याने याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला . तर दुसऱ्या घटनेत चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहे.
अनुप अग्रवाल रा. विश्राम नगर,यांनी कासमवाडी येथील रिक्षास्टॉप जवळ दुचाकी (एमएच १९ सीएस ३९४९) ने ३० जुलै रोजी पार्किंगला लावेलेली होती. एक महिन्यानंतर त्यांनी शनिवारी २७ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार आनंदसिग पाटील करीत आहे.