जळगाव ( प्रतिनिधी ) – विसनजीनगरातील क्रिमसन फूड दुकानासमोर लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ३८ हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर भंडारी (वय-६६) विसनजीनगरात राहतात. गुरूवारी विसनजीनगरातील होमगार्ड कार्यालयाजवळील क्रिमसन फूड दुकानासमोर त्यांनी स्कूटर (एमएच १९ एआर ४४०१) पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी डिक्कीत ठेवलेले ३७ हजार ८०० रुपयांची रोकड तसेच मोबाईल चार्जर, पेन ड्राईव्ह असा मुद्देमाल चोरून नेला किशोर भंडारी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. जुबेर तडवी करीत आहे.







