अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील शासकीय रुग्णालयाजवळ लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यानी ५० हजार रुपये लांबवल्याची घटना दि. २५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण पंडित नेरकर (वय ३२ रा. उंदिरखेडा ता पारोळा) यांनी फिर्याद दिली आहे. ते पेंटर असून त्याची दुचाकी (क्रमांक एम एच १९ ईएफ ४८२९) वर तो गावातून अमळनेर शहरात आला. त्याच्या मोटरसायकलच्या डिक्कीत ५० हजार रुपये होते. काम आटोपून तो गांधलीपुरा भागात आला. मोटरसायकल शासकीय रुग्णालयाजवळ हँडल लॉक करून तो गेला. तिकडून १०:३५ वाजता परत आला असता त्याला त्याचीदुचाकीची डिक्की उघडी दिसली. त्याचे ५० हजार रुपये कोणीतरी चोरून नेल्याचे उघडकीस आले. अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.
दरम्यान पोलीस निरीक्षक विकास देवरे व तपास पथकाने या भागातील लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता गांधलीपुरा भागातीलच स्थानिकाने डिक्कीतील पैसे काढल्याचे दिसून आले.संशयित आरोपी निष्पन्न होताच पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी गेले असता संशयित आरोपी फरार झाले. पोलिसांचा तपास सुरु आहे.