जळगाव तालुक्यात शिरसोली रस्त्यावर झाली होती घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – दुचाकींची धडक होवून झालेल्या अपघातात सुनिल नागा डावर (बारेला) (रा. टेंभी, ता. भगवानपुर, जी. खरगोन, मध्यप्रदेश, ह. मु. रामदेववाडी, ता. जळगाव) या जखमीचा मृत्यू झाला. ही घटना दि. १४ रोजी जळगाव ते पाचोरा रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकीस्वार विरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील उसमळी येथे राहणारे दिलीप तोताराम बारेला हा त्याचा शालक सुनील डावर याच्यासोबत रामदेववाडी येथे वास्तव्यास होता. दि. १४ रोजी ते (एमपी १०, एनई १०१४) क्रमांकाच्या दुचाकीने जळगाव ते पाचोरा रस्त्याने जात होते. यावेळी शिरसोली रोड येथे त्यांना (एमएच १९, ईआर ६६४५) क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात दोघ दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. यातील सुनिल डावर याच्यावर उपचार सुरु असतांना त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ धनराज गुळवे हे करीत आहे.









