अमळनेर तालुक्यात टाकरखेडा परिसरात घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : भरधाव दुचाकीची बैलगाडीला धडक लागून दुचाकीस्वार डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दि. २४ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता घडली. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील (वय २७, रा. टाकरखेडा ता. अमळनेर) असे मयताचे नाव आहे.त्यांच्या पश्चात आई, भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. टाकरखेडा पेट्रोल पंपाच्या पुढे ज्ञानेश्वर मोटरसायकलने अमळनेरकडे जात होता. तेव्हा बैलगाडीला दुचाकी धडकल्याने त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. ऐन दिवाळीत तरुणाच्या निधनाने गावात शोक व्यक्त केला जात आहे.









