नशिराबाद रस्त्यावर रानडुकर समोर आल्याने घडली होती घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : नशिराबाद रस्त्यावर दि.२१ मार्च रोजी रानडुकराच्या धडकेत मोटरसायकल व रिक्षाचा भीषण अपघात झाला होता. यावेळी रिक्षा चालक व दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. या अपघातातील जखमी आनंदा सपकाळे यांचा मृत्यू झाला आहे.
आनंदा नथ्थू सपकाळे (वय ५७) असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सून, मुलगी, बहिणी, मेहुणे, नातवंडे असा परिवार आहे. आनंदा सपकाळे हे चळवळीचे कार्यकर्ते तसेच बौध्द समाजाचे प्रबोधनकार व सामाजिक कार्यकर्ते होते ते रिक्षा चालवून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. (केसीएन)नशिराबाद रस्त्यावर प्रदिप रोटे यांच्या शेताजवळ दि. २१ मार्च रोजी दुपारी ११.३० वाजेदरम्यान आनंदा नथ्थू सपकाळे (वय ५७) हे सुनसगाव कडून नशिराबादकडे रिक्षा क्रमांक (एम एच १९ व्ही ३७१९) घेऊन जात होते.
यावेळी जळगावकडून सुनसगावकडे कोलते नामक दुचाकीस्वार (एमएच १९ बीएच ३३५७) चालवत असताना भर रस्त्यात २ रानडुकरांनी धडक दिली. या धडकेत कोलते यांच्या उजव्या बाजूच्या बरगड्या व खांदा फॅक्चर झाला तर आनंदा सपकाळे यांना मान व पाठीच्या मणक्याला रिक्षाच्या सिटच्या मागील लोखंडी पाईप लागल्याने मणक्याला गंभीर दुखापत झाली होती.(केसीएन)त्यामुळे त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना घरी आणण्यात आले, मात्र दि. २८ रोजी सकाळी ११.३० वाजता अचानक आनंदा सपकाळे यांचे निधन झाले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.