जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कलाभवनाजवळ भरधाव दुचाकी पोलीसांचे बॅरिकेटस घेऊन जाणाऱ्या वाहनावर आदळल्याने दुचाकीवरील दोघे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दि. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. दोघांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
शहरातील शिरसोली नाक्यावरील सद्गुरू नगरातील ईश्वरसिंग मिहेरसिंग टाक (वय-३५) व त्यांचा भाऊ नेपालसिंग मिहेरसिंग टाक (वय-३६) हे दोघे भाऊ दुचाकीने सिंधी कॉलनी परिसरातील कलाभवनाजवळून जात होते. त्यावेळी त्यांच्या पुढे जाणाऱ्या दुचाकी पोलीसांचे बॅरिकेटस घेऊन जाणाऱ्या वाहनावर त्यांची दुचाकी धडकली. या अपघातात दोघांनाही मार लागल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. यातील ईश्वरसिंग यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.