जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील जिल्हा कारागृहाच्या मागील रस्त्यावरून घरी जात असतांना दुचाकी घसरल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. .
अमीन राजू तडवी (वय ३२, रा. वाघ नगर) आणि अशोक शिंदे (वय ३४, रा. जिल्हा पेठ) असे नावे आहे. दोघेजण रविवारी दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता दुचाकीने घरी जात असतांना जिल्हा कारागृहाच्या मागील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांची दुचाकी अचानक घसरली. या अपघातात अमीन तडवी व अशोक शिंदे हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तडवी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.