जळगावातील छ. शिवाजीनगर पुलावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलावर दुपारी १ वाजेच्या सुमारास भरधाव दुचाकी हि डिव्हायडरला धडकल्याने दोघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अद्यापपर्यंत कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
बापू रमेश सपकाळे (वय ४७) व राजेश प्रकाश वाघ (वय २३, दोन्ही रा. आव्हाणा ता. जळगाव) असे जखमी इसमांचे नाव आहे. तालुक्यातील आव्हाणा गावातून बापू सपकाळे हे नातेवाईक राजेश वाघ यांचेसह जळगाव शहरात येत होते.(केसीएन)छत्रपती शिवाजी नगर उड्डाणपूल ओलांडल्यानंतर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी डिव्हायडरवर आदळली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अपघातानंतर रिक्षातून दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे दोघांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, जळगाव शहर पोलीस स्टेशनला घटनेची कुठलीच नोंद अद्याप पर्यंत करण्यात आलेली नव्हती.