जळगाव एमआयडीसीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील एमआयडीसीतील सुमेरसिंग ढाबा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दि. १८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी दि. १९ जुलै रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरात सुमेरसिंग ढाबा येथून मोहम्मद उजेर अनवर शेख (वय २९ रा. फातेमा नगर) आणि त्याचा मित्र कडू पिंजारी हे दोघे शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता दुचाकी क्रमांक (एमएच ०५ बीबी ४६५९) ने जात होते. समोरून येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईएन ६३०६) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मोहम्मद उजेर आणि कडू पिंजारी हे दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात झाल्यानंतर समोरील अज्ञात दुचाकीधारक हा घटनास्थळ येथून पळून गेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे हे करीत आहे.