जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील वृंदावन कॉलनीतून एका मजुराची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय बुधा सपकाळे (वय – ४५) रा. प्रजापत नगर, वृंदावन कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहायला आहे. मजुरी करून ते आपले घर चालवितात. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीएम ८६१२) क्रमांकाची दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी त्यांची दुचाकी ही त्यांच्या घरसमोर लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे दुचाकी चोरून नेल्याचे २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी कुठेही मिळून आल्याने अखेर शनिवारी १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल तायडे करीत आहे.