जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील गांधी मार्केटसमोरील मोकळ्या जागेतून पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सावूस्तर वृत्त अशी की, प्रदीप रविंद्र बारी (वय-२९) रा. मारूती पेठ, जळगाव हा तरूण आपला परिवारासह राहायला आहे. किरकोळ व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता शहरातील महात्मा गांधी मार्केट येथे कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच १९ बीवाय २९७२) ने आला होता. दुचाकी महात्मा गांधी मार्केट समोरील मोकळ्या जागेवर लावली होती. अज्ञात चोरट्याने २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. प्रदीपला दुचाकी जागेवर दिसून आला नाही. दुचाकीचा सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळाली नाही. सायंकाळी ६.३० वाजता शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहे.