अमळनेर शहरात घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- अमळनेर शहरात अमळनेर पो.स्टे.ला मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा, जळगावच्या पथकास चोरीस गेलेली मोटार सायकल ही नाना भिल (रा.ढेकु ता.अमळनेर) हा वापरत असल्याची बातमी मिळाली.
नाना भिल यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर उर्फ नाना भगवान पवार (भिल, वय ४०, रा. ढेकुसिम ता.अमळनेर) असे सांगीतल्याने त्यास विश्वासात घेवून विचारपुस करुन त्याचे कडून २० हजार रुपयांची मोटार सायकल जप्त केली आहे. त्यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी अमळनेर पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई ही पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांनी केली आहे.