भडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी
भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव पोलिसांनी वडजी येथील एका तरुणाला मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेली असून या दुचाकी चोराकडून २ दुचाकी हस्तगत करण्यात भडगाव पोलिसांना यश आले आहे.
भडगाव शहरातून बाळद रोड येथील फिर्यादी यांच्या महाराष्ट्र नावाच्या दुकानासमोरुन दि.२४ रोजी सकाळी फिर्यादीची १० हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची सी.टी. १०० लाल रंगाची (मोटार सायकल क्र. एम.एच.१९.ए.एन.१०९६) मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीवाचून लबाडीचे इराद्याने चोरुन नेली. म्हणुन फिर्याद वरुन भडगाव पोलीस स्टेशनला फिर्यादी शेख मुनाफ शेख युसुफ (वय ३५, रा.हकीन नगर, भडगाव) यांचे फिर्यादवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील मोटार सायकल ही सत्यपाल दत्तात्रय निकम (रा. वडजी ता. भडगाव) याने चोरुन नेली, अशी माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी सदर संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर संशयित आरोपीने ५ गुन्हे केल्याची कबूल दिली असून त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात येवून पोलीस कस्टडी घेण्यात आली. सदर गुन्ह्यात चोरी केलेली मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच अटकेत असतांना इतर ठिकाणावरुन अजुन एक मोटर सायकल अशा दोन मोटर सायकल चोरी केल्याची पोलीस कस्टडीमध्ये कबुली दिल्याने सदरच्या मोटर सायकली गुन्ह्यात आरोपीने काढून दिल्याने त्या जप्त करण्यात आलेल्या आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, स.फौ. प्रदीप चौधरी, पोहेकी निलेश ब्राम्हणकर, पोको सुनिल राजपूत, पोको प्रविण परदेशी यांनी केली असून गुन्हाचा पुढील तपास सफौ प्रदीप चौधरी हे करीत आहेत.