जळगाव, पुण्यात केली होती चोरी
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील शनिपेठ येथुन दुचाकी चोरणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात यश आले आहे.
जीवन गोकुळ शिंदे असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. प्रशांत सानप रा. शनीपेठ, जळगाव यांची दुचाकी (एम एच १९ बी.ई ६२३० ही आव्हाणे शहरातून चोरी गेली होती. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (केसीएन)गुरुवार दिनांक १६ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली. कठोरा येथील राहणाऱ्या जीवन गोकुळ शिंदे, याच्याकडे चोरीचे दोन मोटरसायकल आहेत. बातमीवरुन कठोरा येथून जीवन शिंदे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे असलेल्या दोन्ही मोटरसायकलांबाबत विचारपूस करता तो उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने दोन्ही दुचाकींची माहिती काढली. सीडी डीलक्स मोटरसायकल (एम एच १९बी.ई ६२३० ही प्रशांत सानप रा. शनिपेठ जळगाव यांची दिसून आली. आणि एक सीडी डीलक्स मोटरसायकल क्रमांक (एम एच १२ जीएच ०८९७ ही सुरेश वासुदेव इंगळे रा. दशरथ नगर, श्रीवंतवाडी पुणे यांच्या नावावर असल्याची माहिती मिळून आलेली आहे.(केसीएन)जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आणि एक गुन्हा पुणे येथील दाखल आहे.
संशयित जीवन गोकुळ शिंदे यास जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या मोटरसायकलसह ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पो.हे.कॉ गणेश शिरसाळे, जमीर शेख, किशोर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नाना तायडे, गणेश ठाकरे, नितीन ठाकरे, किरण पाटील, विकास सातदीवे, योगेश बारी यांनी ही कारवाई केली.