जळगाव (प्रतिनिधी ) – एकाची २५ हजार किमतीची दुचाकी चोरल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करन्यात आला आहे. मदनलाल कावणा (वय-३०) रा. सिंधी कॉलनी, कवर नगर,यांच्या घरासमोर २२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान (एमएच १९ बीव्ही ६६४३) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावलेली होती. ती अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. सर्वत्र शोध घेऊन दुचाकी मिळून न आल्याने त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.