जळगाव ( प्रतिनिधी ) – एमआयडीसी परिसरातून दुचाकी लांबविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपी सॅलविन विरेंद्रसिंग ठाकूर (वय-३५) रा. गांधी नगर, गोपाल नगर, भुसावळ असे आरोपीचे नाव आहे.
मंगल पाटील हे गणपती घेण्यासाठी मुलगा सेजस पाटील यांच्यासह मोटरसायकल क्रमांक (एमएच १९ बीएक्स ७९२) २२ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील तोल काटा जवळील हॉटेल निलांबरीजवळ आले होते. त्यांनी दुचाकी पार्किंग करून गणपती घेण्यासाठी गेले. गणपती घेऊन ६.३० वाजेच्या सुमारास पुन्हा पार्किंग लावलेल्या दुचाकीजवळ आले असता दुचाकी मिळून आली नाही, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला होता. फरार असलेला संशयित आरोपी सॅलविन विरेंद्रसिंग ठाकूर (वय-३५) रा. गांधी नगर, गोपाल नगर, भुसावळ या गुरूवार २७ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता कालिंका माता परिसारातून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वी या गुन्ह्यात मुकूंदा सुरवाडे या संशयिताला अटक केली होती.