जळगाव (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुसुंबा शिवारातून एका शेतकऱ्याची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकृष्ण भास्कर पाटील वय ३८ हे शेती काम करीत असून त्यांचे कुसुमबा शिवारातील शेतात ११ रोजी दुपारी दुचाकी क्रमांक एमएच -१९ बीटी ९४६२ हि शेताच्या बांधावर लावलेली दुचाकी कुणीतरी चोरून नेल्याचे निदर्शनास आल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.