अमळनेर (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील मंगरूळ येथे घरासमोरून अज्ञात चोरट्याने ३५ हजार किमतीची दुचाकी लांबविल्याची घटना दि. २४ ते २५ जून दरम्यान घडली आहे.येथील रहिवाशी समाधान भगवान पाटील हे आपल्या कुटुंबियांसह राहत असून मजुरीची कामे करून आपला उदरनिर्वाह करतात .त्यांनी आपली काळ्या रंगाची शाईन दुचाकी क्रमांक एमएच -१९ – डीएच २८५९ हि घरासमोर लावली असता २४ रोजी रात्री ९ :३० पासून ते २५ जूनच्या सकाळी ६ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सकाळी झोपेतून उठल्यानंतर अंगणासमोर दुचाकी आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोकॉ जनार्दन पाटील करीत आहे. दरम्यान परिसरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून दुचाकी चोरट्यांचा पोलिसांनी करावा अशी मागणी होत आहे.








