इतर आरोपींचा शोध सुरु ; अमळनेर पोलिसांची कारवाई

अमळनेर ;- २२ रोजी अमळनेर तालुक्यातील गंगापुरी शिवारात तापी नदीच्या पात्र अवैध रित्या वाळू या गौण खनिजाची चोरठी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक/मालक यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर सदर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांनी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना धक्का बुक््को करुन जिवे ठार मारण्याच्या प्रत्यन करुन त्यांच्या ताब्यातून ३ ट्रॅक्टर वाळूसह पळवून घेऊन गेले होते. सदर घटनेबाबत अमळनेर पो.स्टे.ला गुरनं २३२/२०२१ भादवि कलम ३०७, ३५३, ३७९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे दाखल झाला. त्यातील आरोपी निष्पन्न चार आरोपींपैकी जगन हरसिंग पावरा, वय-५५ वर्षे, रा. अंबदे ता. चोपडा ,महेश ज्ञानेश्वर पवार, वय-२७ वर्षे, रा. रा. अंवर्दे ता. चोपडा धिरज प्रभाकर धनगर, वय-२२ वर्षे, रा. बुधगांब ता. चोपडा यांना आज दि.२६ रोजी साडेसहा वाजेच्या सुमारास अटक करण्यात आलेली असून सदर आरोपीतांनी पळवून नेलेले ट्रॅक्टर क्र. एमएच-१९-९-१५३३ जप्त करण्यात आले आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असून हि कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे , तपासी अंमलदार नरसिंह वाघ, योगेश महाजन,विनोद त्र्यंबक धनगर यांच्या पथकाने केली.







