जळगाव (प्रतिनिधी) : येथील डॅा.यतीन बोरोले हे डि.आर.एन.बी (सुपरस्स्पेशालिटी गैस्ट्रोलॉजी) परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी डि.आर.एन.बी. चे शिक्षण हे मुंबई येथील सुप्रसिद्ध एच.एन रिलायन्स हॉस्पिटल येथे घेतले.
त्यांना सुप्रसिद्ध डॉ. पद्मश्री अमीत मायदेव यांचे मार्गदर्शन लाभले. ते जळगाव येथील डॉ.अजीत बोरोले व यामीनी बोरोले यांचे चिरंजीव असुन जळगाव येथील प्रख्यात न्यूरो सर्जन डॅा.केतन बोरोले यांचे लहान बंधू आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तसेच मित्र मंडळी व नातेवाईकांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.