• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

दृष्टी’दोष दूर करणारे ‘कांताई नेत्रालय’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 19, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
चोरलेले दागिने तारण ठेऊन कर्ज काढणारे आरोपी पकडले

जळगाव ( देवेंद्र पाटील ) – दृष्टिदोषामुळे अनेकांचे खच्चीकरण होते काहींच्या जीवनात कायमचा अंधारही होतो. नेत्रदान करून आजही सृष्टीची चेतना अनुभवणाऱ्या ‘कांताई’ यांच्या नावाने असलेले ‘कांताई नेत्रालय’ रूग्णांचे ‘दृष्टी’ दोष दूर करत रुग्णांच्या जीवनात प्रकाशाची किरणे पोहचवित आहे . मानसिक स्वास्थासह सामाजिक बांधिलकीतून उपक्रम राबवित आहे. आज कांताई नेत्रालयाचा सहावा वर्धापन दिन … त्यानिमित्त हे हितगुज .

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे संस्थापक भवरलाल जैन यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यकक्षेतील महत्त्वाचे अंग असलेल्या कांताई नेत्रालयाची स्थापना 19 जानेवारी 2016 रोजी करण्यात आली. कांताई नेत्रालयाने सहा वर्षात महाराष्ट्रात लौकिक प्राप्त केलाय. वैद्यकीयदृष्ट्याच नव्हे तर सर्वांगिण स्तरावर नेत्ररूग्णांचे आधारवड म्हणून कांताई नेत्रालय नावारूपास आले . 17 हजार 118 शस्त्रक्रिया , दोन लाखाच्यावर नेत्र तपासण्या आणि जळगाव, जालना, बुलडाणा जिल्ह्यातील गरजू नेत्र रूग्णांपर्यंत पोहचण्याकरिता वेळोवेळी 750 हून अधिक नेत्र चिकित्सा शिबीर आयोजन करण्यात आले 70 हजाराहून नेत्र तपासण्या आणि 8 हजाराहून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हे कांताई नेत्रालयाच्या कार्यकक्षा उंचावणारेच आहे .

कांताई नेत्रालयात डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या तपासण्या आणि उपचार, त्यावरील शस्त्रक्रिया अत्याधुनिक यंत्रणेसह गुणवत्तापूर्ण सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. गुंतागुंतीच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया मुंबई, पुणे, औरंगाबादसारख्या मेट्रो सिटीमध्ये न जाता कांताई नेत्रालयात वेळेत यशस्वी उपचारासह होत आहेत. अलिकडेच कांताई नेत्रालयात अत्याधुनिक उपकरणांसह सुसज्ज रेडिना विभागाची सुरूवात करण्यात आली असुन अतिशय क्लिष्ट रेटिना शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. कांताई नेत्रालयात सर्वप्रकारच्या नेत्रसेवा गरिबांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जातात.

कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना अतुल जैन (एमबीबीएस, एम.एस.) या स्वत: रेटिना सर्जन आहेत. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. भावना जैन यांच्यासह अन्य चार तज्ज्ञ डॉक्टरसह सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग, बाह्यरूग्ण विभाग (ओपीडी), डायग्नोस्टीक विभाग व वॉर्ड अशा विविध विभागात 40 सहकारी दृष्टीदोष दूर करण्याचे कार्य करीत आहेत. सुसंवादासह पारदर्शकतेवर भर देणाऱ्या कांताई नेत्रालयाने काळानुरूप अत्यावश्यक यंत्रणा नेत्रालयात आणली. कांताई नेत्रालयाच्या स्थापनेपासूनच सर्व उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. केवळ मोतीबिंदूच नव्हे तर काचबिंदू, लहान मुलांमधील दृष्टीदोष, तिरळेपणा, कॉर्नया (बुबळासंबधी उपचार) व अन्य स्वरूपांच्या सर्व नेत्र विकारांवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात.

‘आय केअर ऑप्टीकल’ या चष्माच्या अत्याधुनिक दालनाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण चष्मे बनविले जातात. आय केअर ऑप्टीकलच्या माध्यमातून आतापर्यंत 32 हजारापेक्षा जास्त चष्मे तयार करून वितरीत करण्यात आले आहेत.

संपूर्ण खान्देश तसेच संलग्न जिल्ह्यात कार्यक्षेत्र विस्तारत असताना कांताई नेत्रालयाने कायमस्वरूपी तपासणी केंद्राची (व्हिजेन सेंटर) निर्मितीसुद्धा केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तर जालना जिल्ह्यातील परतूर यांचा समावेश आहे. याठिकाणी रूग्णांची तपासणी करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविले जाते.

कांताई नेत्रालयामध्ये आता नव्याने ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरेटी’ विभाग सुरू झाला आहे. ज्या मुलांचा प्रसूतीकाळ पुर्ण करण्यापूर्वीच म्हणजेच सातव्या किंवा आठव्या महिन्यात जन्म होतो. त्यांचा रेटिना पुर्णपणे विकसीत होत नाही किंवा त्यात दोष उत्पन्न होऊ शकतो अशा मुलांना पुढे सातत्याने डोळ्यातील मागील पडदाची (रेटिना) तपासणी वारंवार करावी लागते व गरज भासल्यास लेझर उपचार करावे लागतात. अशा सुविधा उपलब्ध करून देणारे जळगाव जिल्ह्यातील कांताई नेत्रालय पहिले रुग्णालय आहे

कांताई नेत्रालयाने कोराना काळातही शासनाच्या नियमावलींचे पालन करून सेवा दिली. कोवीड लसीकरण केंद्र सुरू केले. 5 मार्च 2021पासून आजपावोतो 20 हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पुर्ण केले. हे कार्य अजूनही सुरूच आहे. कांताई नेत्रालयाच्या माध्यमातून शहरातील कॉलन्यांमध्ये कोवीड संसर्गाचे संभाव्य रूग्ण आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. जवळपास 4 हजाराच्यावर घरांमधील नागरीकांची तपासणी करण्यात आली. जैन हेल्थ केअरच्या माध्यमातून वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकरिता विटॅमीन-C, विटॅमीन-B आणि इतर मल्टीविटॅमीन औषध वाटप करण्यात आले. ऑक्सीजनची आवश्यकता असणाऱ्या रूग्णांना घरीच उपलब्ध व्हावा यासाठी ऑक्सीजन कॉन्सटेटरची सुविधा मोफत उपलब्ध करून देत कोरोना काळातही सामाजिक बांधिलकी कांताई नेत्रालयाने जोपासली.

श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या आशिर्वादातून डोळ्यांशी संबंधित सर्व रोगांवर कांताई नेत्रालय स्थापनेपासून उपचार आणि शस्त्रक्रिया करित आहे. आता नव्याने रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरेटी विभाग सुरू झाला असून लवकरच नेत्ररोपणाची (आय ट्रान्सप्लांट) सुविधा कांताई नेत्रालयाद्वारे उपलब्ध केली जात आहे त्याकरिता आवश्यक दिर्घअनुभवी कॉनिर्या सर्जन आता कांताई नेत्रालयात पुर्ण वेळ उपलब्ध असणार आहेत.

-डॉ. भावना अतुल जैन
संचालिका, कांताई नेत्रालय


 

Tags: #jalgaon jaingroup company # bhavarlal & kantai foundetion #maharashtra #bharat
Previous Post

आत्महत्या करू नका, आमच्याशी बोला ; शासकीय मानसोपचार विभागाचे आवाहन

Next Post

देवकर रुग्णालयात आता सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
देवकर रुग्णालयात आता सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया

देवकर रुग्णालयात आता सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon