नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – डीआरडीओचे शास्त्रज्ञ अतुल राणे यांनी सोमवारी ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या सीईओ आणि एमडीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मूळचे रावेर तालुक्यातील सावद्याचे रहिवाशी असलेले अतुल राणे जळगाव जिल्ह्याचे भूषण ठरले आहेत ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेड ही कंपनी सुपरसोनिक क्रुझ मिसाईल बनवते. अतुल राणे हे मिशन क्रिटिकल ऑनबोर्ड कॉम्प्यटरचं स्वदेशी डिझाईन बनवणे आणि विकसित करणे, लूप सिम्युलेशन स्टडीज मध्ये हार्डवेअर, सिस्टीम अनालिसीस, मिशन सॉफ्टवेअरच्या विकास आणि डिफेन्स अॅप्लिकेशनच्या एवियोनिक्स तंत्रज्ञानामध्ये 1987 पासून योगदान देत आहेत.
अतुल राणे यांनी चेन्नईच्या गुइन्डी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पुण्यातून पूर्ण केलं. 1987 मध्ये ते डीआरडीओमध्ये दाखल झाले. अतुल राणे यांनी त्यांची कारकीर्द डीआरडीओच्या प्रयोगशाळेतून सुरु केली त्यांनी भारतात विकसत होत असलेल्या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या आकाश मिसाईल यंत्रणेतील मॉड्युलर रिअल टाईम सिम्युलेशन परिक्षण तंत्र विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ऑनबोर्ड कॉम्प्युटर डिव्हिजनमध्ये अग्नि-1 मिसाईलच बवण्यासाठी नेमण्यात आलेल्या ऑनबोर्ड मिशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामचं नेतृत्त्व केलं. अतुल राणे रशिया सोबतच्या ब्रह्मोस निर्मितीच्या पहिल्यापासून कार्यरत असणाऱ्या टीममध्ये आहेत. ब्रह्मोस टीमच्या सुरुवातीपासूनच्या कोअर टीमचे सदस्य आहेत.