जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन, जळगाव येथे सलग पाच दिवसांपासून आयोजित तेजस्विता २०२६ हा बहुवर्णी शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम आज, उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात विविध स्पर्धा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम यांचा समावेश होता.समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल पी. डोंगरे (डीन, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, उमवी), भावना शर्मा (डिजिटल मीडिया इंटरप्रेन्योर), डॉ. केतकीताई पाटील (सदस्या गोदावरी फॉउंडेशन) आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीलिमा वारके यांनी उपस्थिती दर्शवली आणि कार्यक्रमाची विधीपूर्ण प्रारंभ दीपप्रज्वलन करून केला.कार्यक्रमात भावना शर्मा यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंगच्या युगातील संधींबद्दल मार्गदर्शन करताना सांगितले की मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीने तुम्ही छोट्या शहरातूनही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकता. डॉ. अनिल पी. डोंगरे यांनी तंत्रज्ञानाच्या वेगाने वाढत्या युगात ब्लॉकचेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर डिजिटल कौशल्ये आत्मसात करणे हे यशस्वी भविष्यासाठी गरजेचे असल्याचे सांगितले.डॉ. केतकीताई पाटील यांनी सांगितले की अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे आणि नवीन संधी शोधाव्या. त्यांनी सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन केले.तेजस्विता २०२६ अंतर्गत प्रोफेशनल डे (स्पोर्ट्स डे), मिस-मॅच डे, किड्स डे, रांगोळी, चॉकलेट डे, मेहंदी, ट्रॅडिशनल डे, प्रेस कॉन्फरन्स, सोशल क्टिव्हिटी, कल्चरल डे, डान्स, सिंगिंग आणि ड्रामा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विजेत्या सहभागींना सर्टिफिकेट्स आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमात मिस तेजस्विता या सन्मानाचा श्रेय आदित्य अलकंडी यांनी पटकावला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. ऋतुजा नारखेडे यांनी सभागृहात केले आणि कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि अतिथींना धन्यवाद दिले.डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन, जळगाव हे महाविद्यालय तंत्रज्ञान शिक्षणात उच्च गुणवत्ता प्रदान करण्यास व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला वागत आहे.










