जळगाव (प्रतिनिधी) – मागील ८ वर्षापूर्वी संपूर्ण खूबा बदल शस्त्रक्रिया झालेल्या ५० वर्षीय रुग्णाचा खुबा अचानक जागेवरुन निखळला. असह्यय वेदनांनी त्रस्त झालेल्या रुग्णावर डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातील जॉईंट रिप्लेसमेंट सर्जनद्वारे रिव्हीजन टीएचआर शस्त्रक्रिया करण्यात आली असून रुग्णाची दिनचर्या सुरळीत झाली.
सविस्तर वृत्त असे की, खामगाव तालुक्यातील रहिवासी ५० वर्षीय रुग्णाची आठ वर्षापूर्वी टोटल हिप रिप्लेमेंट शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी सिमेंटेड खुबा बसविण्यात आला होता. त्या खुब्याच्या आधारे रुग्णाचे किमान ८ ते कमाल १० वर्ष निघतात. सदर रुग्ण शेतीकाम करुन उदरनिर्वाह चालवित होता. आठ महिन्यांपूर्वी काम करीत असतांना तो पडला आणि खुब्याला दुखापत झाली. परिणामी त्याला चालणे अवघड झाले आणि डावा पाय देखील ५ सेंटीमीटरने कमी झाला. परिणामी सर्वच शरिराचा तोल ढासळायला लागला. मागील आठ महिन्यापासून रुग्णाने दुखणे अंगावर सहन केले. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आल्यावर अस्थिरोग विभाग प्रमुख तथा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ.दिपक अग्रवाल यांनी रुग्णाची तपासणी करुन एक्स रे करण्यास सांगितला. रिपोर्टनुसार रुग्णाच्या खुबा निघाला असून पेल्विक रिजनलाही दुखापत झाली होती. त्यामुळे रिव्हीजन टीएचआर ह्या शस्त्रक्रियेची गरज होती. रुग्णाच्या संमतीनुसार जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. दिपक अग्रवाल यांच्यासह टिमने आणि भुलरोग तज्ञ डॉ.शीतल यांच्या सहाय्याने खुबा बदल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला चांगल्या दर्जाची केज आणि कॅप (उरसश उअझ) लावण्यात आली. सुरवातीचे काही दिवस वॉकरचा आधार घेऊन रुग्णाची चालायला सुरवात झाली.
—–
मागील दोन दशकात संपूर्ण सांधा बदल शस्त्रक्रिया प्रसिद्ध झाली आहे. ज्यांची खुबा प्रत्यारापेण शस्त्रक्रिया झाली आहे त्यांना कालांतराने पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागते. कुठल्याही कृत्रिम खुब्याचे जीवन हे साधारणत: १० ते २० वर्षे इतके असते. त्यामुळे खूबा खराब झाल्यास अशा प्रकारच्या रिव्हीजन टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची दिनचर्या पूर्ववत होते.
– डॉ.दिपक अग्रवाल,
जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन,
विभागप्रमुख अस्थिरोग,
डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालय.