जळगाव (प्रतिनिधी) :- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील अन्नपूर्णालयम् येथे अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमीत्त प्रभू रामचंद्रांची षोडशोपचार पूजा आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील आणि गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमीत्त रामनामाचा जयघोष करण्यात आला. अन्नपूर्णालयम्चे प्रमुख डी.टी.राव यांनी पौरोहित्य केले.
याप्रसंगी महाआरती करण्यात येवून उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. रॉय, प्रशासकीय अधिकारी प्रा. एन.जी. चौधरी, वैशाली नेमाने यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर्स, अन्नपूर्णालयम्चे सहकारी आणि नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.