जळगाव – डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच यावेळी या घटनेत मृत पावलेल्या पर्यटकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. चंद्रय्या कांते, प्रा. डॉ. बापूराव बिटे, डॉ. प्रशांत गुडेट्टी, महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी शिवराज दाभाडे, ललित सोनार, श्रावणी अवरगांडे, आदित्य निरवळ, स्वराज उभाड, चारूदत्त साळुंखे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.