जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील सन २०१६-२०१७ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासाठी नुकताच दिक्षांत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ३० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते पदवी प्रदान करण्यात आली असून गोल्ड, सिल्व्हर, ब्रोंझ पदकाने तीन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयातील डॉ.केतकी पाटील हॉलमध्ये आयोजित सोहळ्याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, महाराष्ट्र स्टेट ओटीपीटी कॉन्सिल मुंबईचे डॉ.सुदिप काळे (टेरेना कॉलेज ऑफ फिजीओथेरपी महाविद्यालय, मुंबई), महाराष्ट्र स्टेट ओटी अॅण्डी पीटी कौंन्सिलचे एक्झीक्युटिव्ह मेंबर डॉ.शाम गनवीर (प्राचार्य, डीव्हीव्हीपीएफ फिजीओथरेपी महाविद्यालय, अहमदनगर), फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, प्रा.चित्रा म्रिधा, डॉ.सैय्यद साकीफ, डॉ.अमित जैस्वाल, डॉ.निखील पाटील आदि उपस्थीत होते. यावेळी मान्यवरांनी स्वत:चे अनुभव सांगत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी २०१६-१७ मध्ये बॅचलर ऑफ फिजीओथेरपीसाठी प्रवेशित झालेल्या ३० विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्याहस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यात २९ विद्यार्थ्यांना बॅचलर तर एकाला पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. झुमद्वारे र्व्हच्युअल पद्धतीनेही या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टुडंट असोसिएशन ऑफ फिजीओथेरपीचे अध्यक्ष सौरभ पाटील, ट्रेझरर हेमंत लोंढे, गणेश पुंड आदिंचे सहकार्य लाभले. आभार मानसी सावके, महिमा बेंडाळे ह्यांनी मानले. कोविड नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकशी संलग्नित असलेल्या डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील डॉ.ट्विंकल नरेश देवपा ह्यांना सुवर्णपदक, डॉ.अमर सिद्धार्थ दामले सिल्व्हर आणि डॉ.कोमल राम सिंग हे ब्रांझ पदकाचे मानकरी ठरले. तसेच डॉ.आशिष पाटील ह्यांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली.







