जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शनिवार दिनांक ५ ऑगस्ट पासून एमबीबीएस प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र सीईटी सेलने पहिल्या राऊंडमधून डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशित केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस येथे आजपासून सुरुवात झाली. शनिवार दिनांक ५ ते बुधवार दिनांक ९ ऑगस्ट २०२३ पर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार असून सुट्टीच्या दिवशी देखील सकाळी १० ते ५ या वेळेत प्रवेश प्रक्रिया सुरु असणार आहे.
या प्रवेश प्रक्रियेसाठी नोडल ऑफिसर डॉ.दिलीप ढेकळे हे असून संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रवेश प्रक्रिया समिती गठित करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया समितीचे प्रमुखपदी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर हे असून प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, डॉ.माया आर्विकर, विजय मोरे, डॉ.गुरुदत्त मोहरील हे सदस्य आहे. तरी प्रवेश प्रक्रियेबद्दल काही शंका असल्यास नोडल ऑफिसर किंवा समिती सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
तसेच प्रवेश घेण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती देण्याकरीता स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी देखील उपस्थीत असून ते मार्गदर्शन करीत आहे.