जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात संविधान गौरव दिनानिमित्त संविधान पत्रिकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, नर्सिंग विभागाचे संकेत संकपाळ आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. वैभव पाटील यांनी संविधानातील हक्क आणि कर्तव्यांविषयी माहिती दिली. तसेच संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.









