नूतन वर्षानिमित्त रक्तपेढीतर्फे समाजोपयोगी उपक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) –येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या रक्तपेढीतर्फे आयोजित रक्तदान शिबीरात ४२ दात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रही देण्यात आले.
नूतन वर्षानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात समाजोपयोगी उपक्रम घेण्यात आले. यात रक्तपेढीतर्फे वर्ष नवे, संकल्प नवे याला अनुसरून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन माजी खा. डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबीरात उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ४२ विद्यार्थ्यांनी या शिबीरात रक्तदान केले. याप्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, नव्या वर्षात नवनवीन संकल्प केले जातात. मात्र हे संकल्प तडीसही न्यावे लागतात. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबीरांचा संकल्प हा स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रक्तपेढीचे समन्वयक लक्ष्मण पाटील यांच्यासह रक्तपेढीच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले.