सावदा (प्रतिनिधी) : – येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पर्यावरणपूरक श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. गणरायाची मुर्ती कला शिक्षक उमेश बढे यांनी स्वतःच्या हस्ते तयार केली. या कार्यात त्यांना कांचन महाजन व खीलेश राणा यांनी सहकार्य केले. शाळेच्या मुख्याध्यापिका भारती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचार्यांनी उपस्थित राहून गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने परिसर दुमदुमला होता.
भुसावळ डॉ. उल्हास पाटील स्कूलमध्ये बाप्पाचे आगमन
भुसावळ – येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लेझीम व ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. शिक्षकांनी बनविलेल्या पर्यावरणपूरक शाळू मातीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. मुख्याध्यापिका अनघा पाटील यांच्या हस्ते गणपती स्थापना, पूजा करण्यात आली. प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.