एरंडोलमध्ये आमदार अमोल पाटील यांची भव्य प्रचार रॅली
एरंडोल (प्रतिनिधी) – होऊ घातलेल्या एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, एरंडोल शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली आणि कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ३ मध्ये ही प्रचार रॅली मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी, महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉ. नरेंद्र धुडकु ठाकूर आणि प्रभाग क्रमांक ३ अ च्या अधिकृत उमेदवार छायाताई आनंद दाभाडे व ब च्या कमलाताई गोपाल पाटील यांच्यासाठी जोरदार प्रचार करण्यात आला.

आमदार अमोल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
एरंडोल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक उच्चशिक्षित, अनुभवी आणि चारित्र्यसंपन्न उमेदवार म्हणून डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्याकडे आज एरंडोलकर पाहत आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांचा विजय मोठ्या मताधिक्याने होईल, असा ठाम विश्वास आमदार अमोल पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

जनतेच्या प्रचंड पाठिंब्याने उत्साहाने भरलेली रॅली आणि विकासाच्या निर्धाराने गुंजलेल्या घोषणा एरंडोलकरांच्या विश्वासाचा हा विजयाचा मार्ग नक्कीच मजबूत करत आहेत!

भाजपा-शिवसेना युतीचे प्रभाग क्र. ३ चे उमेदवार सौ. छायाताई दाभाडे आणि सौ. कमलबाई गोपाळ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्यासह, सुनीलभैय्या पाटील, शालिक गायकवाड, रवींद्र जाधव, सौ. जयश्री पाटील यांनीही आपले विचार मांडले. या रॅलीला कुणाल महाजन, रुपेश महाजन, डॉ. नरेंद्र पाटील, सुभाष पाटील, आनंद दाभाडे, डॉ. गीतांजली ठाकूर यांच्यासह विश्वनाथ महाजन, बापू चौधरी, शांताराम महाजन, मांगीलाल ठाकरे यांसारखे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.








