जळगाव — डॉक्टर गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मध्ये नवागत विद्यार्थ्यांसाठी विशेष फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी डी.जे सह सांस्कृतिक तसेच मिस्टर अँन्ड मिसेस फ्रेशर्स स्पर्धा घेण्यात आली यात मि. फ्रेशर्स विरेंद्र ताडे तर मिस फ्रेशर्स म्हणून निर्सगा जाधव विजेते ठरले.कार्यक्रमाची सुरूवात एक आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली, ज्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, आणि नाटकाचे प्रदर्शन केले. त्यानंतर, नवागत विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ आणि मनोरंजनात्मक क्रियाकलाप आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फॉउंडेशन उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्य हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील,डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के मिश्रा, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर.गोदावरी नर्सिगच्या प्राचार्या विशाखा गणविर, डॉ. केतकी पाटील स्कुल ऑफ नर्सिंगचे संचालक शिवानंद बिरादर आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. निखिल चौधरी, डॉ. साजीया शेख,डॉ. उमाकांत चौधरी,डॉ तायडे, डॉ. मयुरी चौधरी,डॉ. कोमल पाटील, डॉ. पालवी चौधरी, डॉ. श्रेया पंडीत, डॉ.अमीता निकम यांचेसह सर्व डॉक्टर प्राध्यापक उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांनी आपल्या महाविद्यालयीन जिवनातील आठवणींना उजाळा देत आयुर्वेदात मोठया संधी उपलब्ध असल्याने संशोधनास वाव आहे, भविष्यात वाटचाल करत असताना विविध कौशल्य विकासाची गरज असते. महाविद्यालयातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित असल्याकारणाने विविध कलागुण विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. विद्यार्थ्यांनी जबाबदारीचे भान ठेऊन भविष्याची वाटचाल करावी यावेळी विविध सांस्कृतिक गायन,वादन आणि नृत्य कला सादर करण्यात आल्यात याचबरोबर डी.जे तालावर तरूणाई थिरकली नवागतांसाठी मिस्टर फ्रेशर्स व मिस फे्रशर्स स्पर्धा घेण्यात आली यात मि. फ्रेशर्स विरेंद्र ताडे तर मिस फ्रेशर्स म्हणून निर्सगा जाधव विजेते ठरले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार साक्षी दळवी, आनंद राठी, विरेंद्र ताडे आणि यसरा देशमुख यांनी केले. समारोप वंदेमातरमने करण्यात आला. यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी चेतन चौधरी ,मोहीत येवले यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.