जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे आज धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात कॉलेज व हॉस्पिटलमधील सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच नॉन-टीचिंग स्टाफ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे वातावरण धार्मिक आणि प्रेरणादायी झाले होते.