जळगाव (प्रतिनिधी) :- अण्णासाहेब करोले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ऍकलॅप सदस्य डॉ. प्रभू व्यास यांनी १२५ व्यांदा नुकतेच रक्तदान केले. डॉ. प्रभू व्यास नियमितपणे रक्तदान करतात व व्याख्यान देतात. रक्तदानासोबत रक्तदान करायला प्रवृत्त करतात. त्यांनी जेसीस, रोटरी, ओम शांती व इतर सामाजिक संस्थांतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. अनेक वेळा रात्री पण जाऊन रक्तदान करतात. यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. चौधरी, अधिकारी उज्वला वर्मा, ऍकलॅप अध्यक्ष दिलीप पाटील, प्रमोद सोनार, हरीश सोनार, जोशी इत्यादी उपस्थित होते.