“स्वीड एम्बोलाझेशन”ची जळगावात ॲक्सॉन हॉस्पिटल येथे यशस्वी शस्त्रक्रिया
जळगाव ( प्रतिनिधी ) – खान्देशात प्रथमच मेंदूच्या दुर्मिळ नसांच्या जाळ्यांसाठीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जळगाव येथे डॉ. निलेश किनगे यांच्या ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या पार पाडली. यामुळे रुग्णाला जीवदान लाभले असून रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहे.
इंदल राठोड (वय ५७) हे कल्याणचे रहणारे गृहस्थ अचानक फीट्सचा (झटके किंवा अपस्मार) झटका येऊन बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तिथे एमआरआय केल्यावर त्यांच्या डोक्यात नसांचे म्हणजेच शुद्ध व अशुद्ध रक्तवाहीनीचे जाळे असल्याचे निदान झाले. यालाच मेडीकल भाषेत ड्युरल एव्ही फिस्तूला असे म्हणतात. यासाठी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचे सांगण्यात आले. परंतु सदर गृहस्थ हे मुळचे शेंदुर्णी ता. जामनेरचे असून, त्यांनी जळगाव येथे उपचार करण्याचे ठरवले. जळगावात त्यांना डॉ. निलेश किनगे (इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजीस्ट) यांच्या ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले.
विविध तपासणीअंती डोक्यातील मेंदुचे जाळे पाहून डॉ. निलेश किनगे यांनी इंदल राठोड यांना हे जाळे कायमचे बंद करण्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. या ऑपरेशनला (squid embolization) स्वीड एम्बोलाझेशन असे म्हणतात. पण या जाळ्यामधी रक्तप्रवाह अतिशय वेगात असल्याने डॉ. निलेश किनगे यांनी सगळ्यात आधी रक्तप्रवाहाचा वेग कमी करण्यासाठी बलूनचा म्हणजेच फुग्याचा वापर करून रक्तप्रवाह कमी केला.
मेंदुच्या गुंतागुतीचे हे जाळे बंद करण्यासाठी मांडीच्या शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहीनितून तार टाकून मेंदूपर्यंत पोहचवत हि शस्त्रकिया करण्यात आली या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ५ तास वेळ लागला. विदेशी तंत्रज्ञान शस्त्रक्रियेसाठी वापरले गेले. शस्त्रकिया कॅथ लॅबमध्ये करण्यात आली. कसलीही चीरफाड न करता शस्त्रकिया करण्यात आली.
मेंदूतील हे गुंतागुंतीचे जाळे बंद झाल्याने भविष्यात हे जाळे फुटून रक्तस्त्राव होण्याचा फीटस येण्याचा धोका नगण्य झाला आणि पेशंट पूर्णपणे बचावला. डॉ. निलेश किनगे यांनी हया दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाला पुनर्जन्म दिला अशी भावनिक प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली आहे.