एरंडोल (प्रतिनिधी) :- येथील माजी नगरसेवक, भूलवैद्यकतज्ञ डॉ. नरेंद्र ठाकूर ह्यांची नुकतीच उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकपदी राज्य संयोजक डॉ. बाळासाहेब हरपळे व प्रदेश प्रभारी खा. डॉ. अजित गोपछडे ह्यांनी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे भाजप वैद्यकीय आघाडी ने राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विधानसभा संयोजक म्हणून एका सदस्याची नियुक्ती विधानसभा निवडणुकीसाठी केलेली आहे.
डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांनी ह्यापूर्वी भाजप वैद्यकीय आघाडी जळगाव जिल्हा कार्यकारणी सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष व मागील तीन वर्षे भाजप वैद्यकीय आघाडी जळगाव जिल्हा मुख्य संयोजक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. डॉ. नरेंद्र ठाकूर हे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक व राजकीय क्षेत्रात हि कार्यरत असून ” सुखकर्ता फाउंडेशन” ह्या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्याचप्रमाणे इतर विविध संस्थाच्या द्वारे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत .कोरोनाच्या संकटकाळात एरंडोल परिक्षेत्रात केलेल्या विविधांगी समाजोपयीगी कार्याबद्दल राज्यपाल ह्यांच्या हस्ते “कोरोनावीर ” म्हणून डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांना सन्मानित करण्यात आले आहे .
डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांनी ह्या नियुक्तीबद्दल भाजप वैद्यकीय आघाडी चे माजी प्रभारी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, माजी विभागीय संघटनमंत्री तथा प्रदेश अनु . जनजाती क्षेत्रीय संपर्क प्रमुख ऍड . किशोर काळकर, महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष तथा प्रभारी खा. डॉ अजित गोपछडे, प्रदेश संयोजक डॉ बाळासाहेब हरपळे, प्रदेश सहसंयोजक डॉ. राहुल कुलकर्णी, प्रदेश सहसंयोजक डॉ प्रशांत पाटील ह्यांचे आभार मानले आहेत .