आ. राजूमामा भोळे यांनी केले स्वागत
जळगाव (प्रतिनिधी) : मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आज सोमवारी दुपारी ४ वाजता विशेष विमानाने जळगाव विमानतळावर दाखल झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी जळगावचे आ. राजूमामा भोळे, जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तसेच पोलीस विभागाच्यावतीने अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपस्थित होते.
मुख्यमंत्री यादव यांचे औपचारिक स्वागत झाल्यानंतर त्यांनी पुढील प्रवासासाठी जळगाव विमानतळावरून हेलिकॉप्टरने बुरहानपूरकडे (मध्यप्रदेश) प्रस्थान केले. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली.