मतदारांच्या भेटी घेत कार्यकर्त्यांशी केला संवाद
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण पवार पाटील यांच्याकरीता पारोळा येथे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी तालुक्यात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
पारोळा तालुक्यात बोदर्डे, शेवगे बु, महाळपूर, कंकराज, भिलाली, कोळपिंप्री, भोलाणे, पिंपळकोठा, वसंतनगर, इंधवे, सुमठाणे, जिराडी या गावात डॉ. हर्षल माने यांनी प्रचार प्रसार केला. याठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख डॉ. शांताराम पाटील,शिवसेना पारोळा तालुकाप्रमुख प्रा आर बी पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष महाजन, पारोळा कृ.उ.बा.समिती संचालक रविंद्र रामराव पाटील, डॉ प्रवीण पाटील, रोहन पवार, हिम्मत पाटील, पारोळा कृ.उ बा.समिती उपसभापती पिंटू शेठ, इंधवे येथील पिंटू नाना, बाहुटे येथील बाळू पाटील, अनिल पाटील, अमोल पाटील, रविंद्र पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते.