जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील डॉ.उल्हास पाटील आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालय तथा रिसर्च सेंटरचा राजा शरदचे आज पाचव्या दिवशी भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
यावेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, यांच्या हस्ते आरती व पूजन करण्यात आले. अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. पालवी चौधरी, प्रा अमीता निकम,डॉ.कोमल खंडागळे यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत हाते. परिसरातून ढोलताशाच्या गजरात श्री गणरायाची मिरवणूक काढण्यात आली.